उस्मानाबाद येथे लेखा व कोषागारे दिन उत्साहात साजरा

0


उस्मानाबाद येथे लेखा व कोषागारे दिन उत्साहात साजरा

 

         उस्मानाबाद,दि.2(जिमाका):- प्रतिवर्षी प्रमाणे दि.01 फेब्रुवारी रोजी जिल्हा कोषागार कार्यालय येथे लेखा व कोषागारे दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त आरोग्य विषयक तपासणी, कार्यालयाची सजावट, उत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार वितरण, गुणवंत पाल्य गौरव सोहळा, राज्यस्तरीय आणि विभागीय क्रीडा स्पर्धेत विविध खेळात प्राविण्य मिळवलेल्या खेळाडूंचा सत्कार व महाराष्ट्र राज्यात कोषागार मानांकनात कोषागार कार्यालयाने प्रथम स्थान प्राप्त केला. त्यासाठी काम केल्याबाबत कर्मचारी यांना प्रमाणपत्र वाटप, सेवाप्रवेशोत्तर परीक्षा उत्तीर्ण कर्मचारी पुरस्कार वितरण, पदोन्नत झालेले कर्मचारी पुरस्कार वितरण असे विविध उपक्रम घेण्यात आले.

                तत्पूर्वी कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि सरस्वती पूजन करून करण्यात आले. या कार्यक्रमास जि.प.चे मुख्य लेखा वित्त अधिकारी सुरेश केंद्रे, जिल्हा कोषागार अधिकारी सचिन संदिपान इगे, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता ना.सु. गंगासागरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी महेश तीर्थकर, स्थानिक निधी लेखा कार्यालयाच्या सहायक संचालक श्रीमती अर्चना नरवडे, परिविक्षाधीन अधिकारी सचिन सालकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी आरोग्य विषयक तपासणी कार्यक्रमामध्ये 56 अधिकारी, कर्मचारी यांनी लाभ घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लेखालिपीक श्रीमती पुजा दळवे व श्रीमती चैताली फुलारी यांनी केले. तसेच प्रास्ताविक सचिन संदिपान इगे आणि आभार प्रदर्शन अप्पर कोषागार अधिकारी चंद्रशेखर काजळे यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी जिल्हा कोषागार कार्यालयामधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top