आर.पी .कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाला "ए" श्रेणी मूल्यांकन प्राप्त
धाराशिव (प्रतिनिधी)-डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील .आर पी. कॉलेज ऑफ फार्मसी या महाविद्यालयाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी लोणेरे, रायगड, अंतर्गत सन 2022-23 या शैक्षणिक वर्षात घेण्यात आलेल्या अकॅडमिक मॉनिटरिंग कमिटीद्वारे "ए " श्रेणी मूल्यांकन प्राप्त झाले आहे.महाविद्यालयातिल शिक्षणाचा दर्जा सुधारावा यासाठी विद्यापीठ दरवर्षी अशी कमिटी तपासणीसाठी पाठवत असते.तसेच या कमिटीद्वारे महाविद्यालयातील सर्व मूलभूत सोई सुविधांची व कामाची तपासणी करण्यात आली.तपासणीतंर्गत सुविधा आणि काम समाधानकारक असल्याचे आढळून आले. तसेच महाविद्यालयामध्ये यावर्षीपासून एम.फार्मसी ( केमिस्ट्री आणि फार्माकोलॉजी) या दोन शाखेची सुरुवात झाली आहे.या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.शेख गाझी व इतर कर्मचारीवृंद यांचे अभिनंदन आणि कौतुक केले आणि अशीच उत्तरोत्तर संस्थेची प्रगती करावी अशा शुभेच्छा दिल्या.