हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रंहे उर्सावर कोरोणाचे संकट! फक्त धार्मिक विधी होणार! -
( Hazrat Khwaja Shamshoddin Ghazi Rahe Urs ) Osmanabad ( फोटो संग्रहीत )
उस्मानाबाद : जिल्ह्यातील उस्मानाबाद शहरातील दर्गा हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रहै यांंचा उर्स 14 फेब्रुवारी 2022 पासून विविध धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात होणार आहे याबाबत जिल्हाधिकारी यांनी या कार्यक्रमाला परवानगी दिली असून कोवीडच्या अनुषंगाने नियमांचे पालन करत फक्त पन्नास लोकांच्या उपस्थितीमध्ये धार्मिक विधी करण्यास परवानगी दिली आहे.
दोन वर्षापासून या ठिकाणी फक्त धार्मिक कार्यक्रम घेऊन उर्स साजरा करण्यात येत आहे. यावर्षी देखील कोरोनाचे संकट असल्याने याठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी फक्त धार्मिक कार्यक्रमांना परवानगी दिली आहे हजरत ख्वाजा शमशोद्दीन गाजी रंहे यांच्या उर्सा साठी जगभरातून भाविक याठिकाणी हजेरी लावतात मात्र दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट असल्याने धार्मिक विधी पूर्ण करत या ठिकाणी उर्स साजरा करण्यात येत आहे.
उरूस साजरा करण्याबाबत वक्फ बोर्डला जिल्हाधिकारी यांनी हे पत्र दिले आहे व बोलणे उरूस साजरा करण्याबाबत परवानगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केले होते