जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाईन तारखा जाहीर , Zilla Parishad Recruitment

0



जिल्हा परिषद मधील विविध पदांच्या भरतीसाठीच्या ऑनलाईन तारखा जाहीर , Zilla Parishad Recruitment


Osmanabad news : धाराशिव.दि.12,(जिमाका):-*  जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया सन 2023 च्या 5 ऑगस्ट 2023 रोजी प्रसिध्द केलेल्या जाहिरातीमधील पदापैकी 15 ऑक्टोबर रोजी कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) व कनिष्ठ अभियंता (विद्युत) तर 17 ऑक्टोंबररोजी तारतंत्री,जोडारी व पशुधन पर्यवेक्षक  या पदांसाठी ऑनलाईन परीक्षा तीन सत्रात घेण्यात येणार आहे.


                ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (Hall Ticket) डाउनलोड (Download) करण्याबाबतची लिंक जिल्हा परिषद धाराशिवच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी प्रवेशपत्र (Hall Ticket) व माहितीपुस्तीका उपरोक्त संकेतस्थळावरुन प्राप्त करुन घ्यावे,असे आवाहन  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे.  
                                  *****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top