उस्मानाबाद - धाराशिव पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत धाराशिव जिल्हा दौऱ्यावर
उस्मानाबाद -धाराशिव.दि.12,(जिमाका):- राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत हे उद्या 13 ऑक्टोंबर रोजी उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
13 ऑक्टोंबर रोजी सकाळी 8.00 वाजता कात्रज पूणे येथून मोटारीने धाराशिवकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता पालकमंत्री कार्यालय उस्मानाबाद-धाराशिव येथे आगमन व राखीव. दुपारी 1.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे आगमन व बैठकीस उपस्थिती. तुळजापूर येथे होणाऱ्या शारदीय नवरात्र महोत्सव 2023 व नियोजित महाआरोग्य शिबीर पूर्व तयारीबाबत बैठक तसेच टंचाई आढावा बैठक. दुपारी 3.00 वाजता धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालय येथून मोटारीने तुळजापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वाजता तुळजापूर येथे आगमन व महाआरोग्य शिबीर स्थळ पाहणी. तुळजापूर देवस्थान संस्थानाचे पदाधिकाऱ्यांसोबत बैठक. सायंकाळी 4.30 वाजता तुळजापूर मंदिर येथे दर्शन. सायंकाळी 4.45 वाजता तुळजापूर येथून सोलापूरमार्गे कात्रज-पूणेकडे प्रयाण.
*****