हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना

0


हवामानावर आधारीत फळपीक विमा योजना 

         उस्मानाबाद - धाराशिव,दि.12 (जिमाका): आधारीत फळपीक विमा योजना पुढील तीन वर्षांसाठी राबविण्यास शासनाने मान्यता दिली आहे. धाराशिव जिल्ह्यासाठी अंबे बहरात द्राक्ष, मोसंबी, डाळिंब,केळी,आंबा व पपई या पिकांचा समावेश आहेकर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी  ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभाग घ्यावयाचा नसेल तर कर्ज घेतलेल्या धिसुचित पिकांकरीता नोंदणीच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस आधीपर्यंत संबंधीत बँकेस विमा हप्ता कपात न करणेबाबत घोषणापत्र देणे आवश्यक आहे. जे कर्जदार शेतकरी योजनेत सहभागी होणेबाबत घोषणापत्र देणार नाही त्या सर्व शेतकऱ्यांचा योजनेमध्ये सहभाग बंधनकारक समजला जाईल. या योजनेअंतर्गत अवेळी पाऊस, कमी तापमान, जास्त तापमान, सापेक्ष आर्द्रता, वेगाचा वारा, गारपीट या हवामान धोक्यापासून संरक्षण मिळणार आहे. योजनेत सहभाग घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करणे बंधनकारक आहे. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी अर्जासोबत आधारकार्ड, सात-बारा उतारा, फळबागेचा अक्षांश व रेखांशासह फोटो व बँक पासबुकची प्रत आदी कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांना गारपीट या हवामान धोक्याकरिता सहभाग नोंदवावयाचा असेल अशा शेतकऱ्यांनी त्यांचा नियमित व अतिरिक्त विमाहप्ता बँकेमार्फतच भरणे आवश्यक आहे.

 फळपिकनिहाय अधिसूचीत महसूल मंडळातील शेतकऱ्यांना या योजनेत सहभाग घेता येईल. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे. शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी pmfby.gov.in या संकेतस्थळाचा वापर करावा किंवा नजिकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top