साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त उस्मानाबाद शहरात विविध ठिकाणी अभिवादन
Osmanabadnews : थोर साहित्यिक साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 103 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी कार्यालय प्रतिष्ठान भवन या ठिकाणी व लहुजी साळवे चौक येथे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे यांच्या हस्ते पुजन करुन अभिवादन करण्यात आले.
यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य मिलिंद पाटील, व्यंकटराव गुंड, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, राहुल पाटिल सास्तुरकर, संदीप इंगळे, अरूण पेठे, पूजा देडे, सागर दंडनाईक, इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.