पाणी जपून वापरा धाराशिव शहरातील नागरिकांना नगरपालिकेच्या वतीने आवाहन, उजनी पाईपलाईन फुटली!

0

पाणी जपून वापरा धाराशिव शहरातील नागरिकांना  नगरपालिकेच्या वतीने आवाहन, उजनी पाईपलाईन फुटली! 

धाराशिव : धाराशिव शहर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत असलेल्या उजनी ते धाराशिव मुख्य पाईपलाईन खांडवी गावाजवळ लिकेज झालेली असून लिकेज दुरुस्तीचे काम सुरु आहे त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा उशिराने करण्यात येणार आहे. तरी शहरातील नागरिकांना याद्वारे आव्हाहन करण्यात येते की पाण्याचा काटकसरीने वापर करून नगर परिषदेस सहकार्य करावे. असे प्रसिद्धीपत्रक नगरपरिषद धाराशिव च्या वतीने १ जुन रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. 

धाराशिव शहराला सध्या अकरा दिवसाला पाणीपुरवठा होत असून नगरपालिकेने शहरात नऊ दिवसाला पाणीपुरवठा होईल असे प्रसिद्धीपत्रक काढले होते मात्र सध्याची शहरातील परिस्थिती अत्यंत बिकट असून शहरात अनेक ठिकाणी पाणीपुरवठा विभागाकडून मनमानी कारभार करत पाणी सोडण्यात येत आहे असा आरोप नागरिकांच्या वतीने करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी पाईपलाईन वर मोठ्या प्रमाणात कनेक्शन झाल्याने नागरिकांना होणारा पाणीपुरवठा पुरेसा होत नाही क्षमतेपेक्षा जास्त एका लाईनवर कनेक्शन दिल्याने गतीने पाणी येत नाही त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे त्याचबरोबर आता पाईपलाईन फुटल्याने पाईपलाईन कधी दुरुस्त होईल व पाणी किती उशिरा येणार हे देखील नगरपालिकेने स्पष्ट सांगितलेले नाही त्यामुळे शहरातील नागरिक मोठ्या पाणी टंचाईला समोर जाणार आहेत हे दिसून येत आहे. धाराशिव शहरातील नवीन वाढलेल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई निर्माण होत आहे एक तास पाणी सोडले जाते व पाईपलाईन वर जास्त कनेक्शन झाल्याने पूर्ण गतीने पाणी नागरिकांना मिळत नाही अशी माहिती उस्मानाबाद न्यूज ला धाराशिव शहरातील नवीन वाढलेल्या भागातील नागरिकांनी संपर्क केल्यावर दिली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top