आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

0

धाराशिव -
डॉ. वेदप्रकाश पाटील शैक्षणिक संकुलातील आर.पी. कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांचा  निरोप समारंभाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सदरील कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष  डॉ.प्रतापसिंह पाटील हे उपस्थित होते.तसेच डॉ.आदिनाथ राजगुरू (संचालक, आयव्हीएफ कन्सल्टंट अक्षय हॉस्पिटल,धाराशिव) डॉ.फारूक तांबोळी(अयाजुल डेंटल क्लिनिक, बार्शी) डॉ.सुरज नन्नवरे ( प्राचार्य, एस.बी.एन.एम.कॉलेज ऑफ फार्मसी,धाराशिव), डॉ.शेख गाझी  (प्राचार्य,आर.पी.कॉलेज ऑफ फार्मसी,धाराशिव) यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून करण्यात आली. 


डॉ.शेख गाझी यांनी प्रस्तावित करताना सांगितले की,अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना त्यांच्या भविष्यातील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व फार्मसी क्षेत्रामध्ये आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश,संधी या विषयी माहिती दिली.

यावेळी डॉ.प्रतापसिहं पाटील यांनी फार्मसी क्षेत्रातील वाढती गरज ओळखून विद्यार्त्यांनी या क्षेत्राकडे कसे वळावे व व्यवसायाच्या संधी कशा निर्माण कराव्यात या विषयी आपली भूमिका मांडली.व येणाऱ्या काळात भारत हा फार्मसी क्षेत्रामधला सर्वोच्च देश असेल असे मत व्यक्त केले.तसेच डॉ.राजगुरू यांनी कोविडच्या काळात फार्मसी क्षेत्रातील लोकांचे असलेले योगदान व केलेली रुग्णसेवा या विषयी आपले मनोगत व्यक्त केले तसेच डॉ.तांबोळी  यांनी फार्मसी हे या काळातील सर्वोत्तम क्षेत्र असल्याचे सांगितले व या क्षेत्राकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल याविषयी आपले मनोगत व्यक्त केले.


 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.शिवानी येडे आणि कु.मधूलक्ष्मी थोरात यांनी केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अजहर  यांनी केले.कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्राध्यापक आणि इतर कर्मचारी,विद्यार्थी , विद्यार्थिनी या सर्वांनी मोलाची साथ दिली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top