धाराशिव ता.6 – उस्मानाबाद धाराशिव मतदारसंघात (ता.सात) रोजी तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. मतदान प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी निवडणुक विभागाकडुन काळजी घेतली पाहिजे. यामध्ये काही लोकाकडुन गुप्त मतदान प्रक्रियेचा भंग होण्याची शक्यता आहे. मतदारांना पैश्याचे आमिष दाखवुन मतदान करताना मोबाईलवर फोटो अथवा व्हीडीओ चित्रीत करण्यास भाग पाडले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची दखल घेऊन मतदान केंद्रावर मतदान कक्षात मोबाईल वापरास प्रतिबंध करण्यात यावा, ही प्रक्रिया निःपक्ष व पारदर्शक मतदान प्रक्रिया पार पडेल. महाविकास आघाडीच्यावतीने ही मागणी करण्यात आली आहे. यावर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख कैलास पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धिरज पाटील यांची नावे आहेत.
मतदान केंद्रावर मतदान करताना मोबाईलला प्रतिबंध करावा महाविकास आघाडीची निवडणुक अधिकारी यांच्याकडे मागणी
मे ०६, २०२४
0
Tags
अन्य ॲप्सवर शेअर करा