पोलीस दलाच्या भारत गॅस एजन्सी व्दारा घरपोच सिलींडर वितरण सुरू -पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौषन यांच्या हस्ते उद्घाटन
उस्मानाबाद :-जिल्हा पोलीस दलाच्या ‘पोलीस कल्याण षाखा’ अंतर्गत उस्मानाबाद षहरात ‘उस्मानाबाद पोलीस भारत गॅस एजन्सी’ व ‘उस्मानाबाद पोलीस पेट्रोलीयम विक्री केंद्र’ चालवले जाते. यातुन मिळणारा नफ्यातुन पोलीस व कुटुंबीयां करीता योजना, कार्यक्रम राबविल्या जातात. यातील ‘उस्मानाबाद पोलीस भारत गॅस एजन्सी’ व्दारे उस्मानाबाद शहरातील ग्राहकांना घरपोच सिलींडर वितरणाच्या सुविधेचे उद्घाटन मा.पोलीस अधीक्षक श्री.राज तिलक रौषन यांच्या हस्ते आज दि.01/12/2020 रोजी पोलीस मुख्यालयात करण्यात आले. यावेळी पोलीस कल्याण षाखेचे पोलीस निरीक्षक श्री.दगुभाई षेख यांसह सहायक पोलीस निरीक्षक विनोद चैधरी, संदीप मोदे यांसह मुख्यालयातील पोलीस अंमलदार हजर होते. (सोबत छायाचित्र जोडले आहे.)