लोहारा महाराष्ट्र ग्रामीण बँकेत स्वागत व निरोप समारंभ

0

लोहारा ( महादेव पाटील ) शहरातील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे कॅशियर श्री कुलदीप पवार यांची उमरगा येथे बँक मॅनेजर बदली व नव्याने रुजू झालेले मॅनेजर एम एम बोडगे स्वागता निमित्त शुक्रवारी (दि.११) रोजी हरी लोखंडे व मित्र परिवार कडून सत्कार करण्यात आला.

  लोहारा शहराच्या वतीने व मित्र परिवाराच्या वतीने ग्राहकसेवेला प्राधान्य देत अपुऱ्या सुविधा आणि अपुरा कर्मचारी वर्ग असताना जास्तीत जास्त चांगली सेवा करण्याचा श्री पवार यांनी प्रयत्न  केला. नव्याने रुजू झालेले लोहारा बँकेचे मॅनेजर एम एम बोडगे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी शरणाप्पा कबाडे, हरी लोखंडे, वैजीनाथ पाटील, महेश जट्टे, मल्लिनाथ वचने पाटील, प्रभाकर बिराजदार, श्रीशैल्य स्वामी, दयानंद स्वामी, दत्ता रोडगे, धर्मा देवकर आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top