उस्मानाबाद जिल्ह्यात विविध प्रकारचे पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे

0



उस्मानाबाद जिल्ह्यात विविध प्रकारचे पोलीस ठाण्यात दाखल झालेले गुन्हे 


मोटार वाहन कायदा अंतर्गत कारवाई.

उस्मानाबाद पोलीस दलातर्फे दि. 14 ऑगस्ट रोजी महत्वाच्या रस्त्यांवर मोटार वाहन कायदा- नियम व कोविड- 19 संबंधी मनाई आदेशांची अंमलबजावनी करुन नियम भंग करणाऱ्यांवर एकुण  352 कारवाया करुन 88,900 ₹ ‘तडजोड शुल्क’ वसुल केले आहे.

 

अवैध मद्य विरोधी कारवाई.

नळदुर्ग पोलीस ठाणे :  धर्मराज आडसुळ, रा. गंधोरा, ता. तुळजापूर हे दि. 13 ऑगस्ट रोजी 20.30 वा. सु. गंधोरा शेत शिवारात 14 लि. गावठी दारु अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले नळदुर्ग पो.ठा. च्या पथकास आढळले.

 

तुळजापूर पोलीस ठाणे :  मौला शेख, रा. कसई, ता. तुळजापूर हे दि. 14 ऑगस्ट रोजी 21.10 वा. सु. गावातील एका ढाब्यासमोर देशी- विदेशी दारुच्या बाटल्या अवैध विक्रीच्या उद्देशाने बाळगलेले तुळजापूर पो.ठा. च्या पथकास आढळले.

            यावरुन पोलीसांनी अवैध मद्य जप्त करुन नमूद दोघांविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत गुन्हे नोंदवले आहेत.

 

सार्वजनिक ठिकाणी निष्काळजीपनाचे कृत्य करणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल.

उस्मानाबाद जिल्हा : 1) ईस्माईल जिलानी शेख, रा. येडशी यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी 12.30 वा. सु. येडशी टोलनाक्याजवळील आपल्या हॉटेल मध्ये निष्काळजीपने, हयगईने अग्नी प्रज्वलीत करुन भा.दं.सं. कलम- 285 चे उल्लंघन केले असतांना उस्मानाबाद (ग्रा.) पो.ठा. च्या पथकास आढळले. तर 2) मनोजकुमार मोहन होरे, रा. बोडका, ता. परंडा यांनी याच दिवशी परंडा येथील सार्वजनिक रस्त्यावर 12.30 वा. सु. आपली मोटारसायकल रहदारीस धोका निर्माण होईल अशा निष्काळजीपने भर रस्त्यात उभा करुन भा.दं.सं. कलम- 283 चे उल्लंघन केले असतांना परंडा पो.ठा. च्या पथकास आढळले. यावरुन पोलीसांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन नमूद दोघांविरुध्द संबंधीत पो.ठा. येथे गुन्हे नोंदवले आहेत.

 

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्यावर गुन्हा दाखल.

कळंब पोलीस ठाणे : चालक- दत्ता मुंढे, रा. उपळाई हे एस.टी. बस क्र. एम.एच. 20 बीएल 3168 ही  दि. 13 ऑगस्ट रोजी 18.45 वा. सु. कळंब येथील छ. शिवाजी महाराज चौकातून कळंब बसस्थानकात बस नेत असतांना कळंब ग्रामस्थ- फिरोज पाशा बागवान यांनी एस.टी. एसच्या समोरील काच दगड फेकून मारुन फोडल्याने अंदाजे 12,000 ₹ चे आर्थिक नुकसान झाले. अशा मजकुराच्या दत्ता मुंढे यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 336, 427 सह सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंध अधिनियम कलम- 3 (2) (ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

चोरी.

उस्मानाबाद (श.) पोलीस ठाणे : श्रीराम जिंतुरकर, रा. संजीवनी ईस्पीतळाजवळ, उस्मानाबाद यांच्या इमारतीच्या छतावरुन कृष्णा दत्तात्रय जाधव, वय 27 वर्षे, रा. चिलवडी, ता. उस्मानाबाद याने दि. 14 ऑगस्ट रोजी 00.30 वा. सु. वरील मजल्यावरील घरात प्रवेश करुन कपाट- टेबल उघडून त्यातील साहित्य चोरी करण्याचा प्रयत्न केला. अशा मजकुराच्या जिंतुरकर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 380, 511 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मुरुम पोलीस ठाणे : आष्टा (कासार), ता. उमरगा येथील संजय शिंदे, राजेंद्र शिंदे व सुधीर सोलापुरे यांच्या आष्टाकासार शेतातील तीन गायी दि. 11- 12 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेल्या. अशा मजकुराच्या संजय शिंदे यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

आनंदनगर पोलीस ठाणे : आशा मुंढे, रा. वडगाव (ज.) ता. कळंब या दि. 14 ऑगस्ट रोजी 14.15 वा. सु. उस्मानाबाद बसस्थानकातील बसमध्ये चढत असतांना अज्ञाताने गर्दीचा फायदा घेउन मुंढे यांच्या पिशवीतील 16 ग्रॅम सुवर्ण दागिने व चांदीचे चैन असलेली पर्स चोरुन नेली. अशा मजकुराच्या आशा मुंढे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

अपघात.

वाशी पोलीस ठाणे : दत्तात्रय भिमराव चव्हाण, वय 39 वर्षे, रा. पारगांव, ता. वाशी हे मोटारसायकल क्र. एम.एच. 12 केजी 9417 ही दि. 08 ऑगस्ट रोजी 14.00 वा. सु. इंदापुर फाटा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 वर चालवत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने ट्रक क्र. ए.पी. 28 टीबी 7457 ही निष्काळजीपने चालवून दत्तात्रय चव्हाण चालवत असलेल्या मो.सा. ला पाठीमागून धडक दिल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. या अपघातानंतर नमूद ट्रकचा अज्ञात चालक जखमीस वैद्यकीय उपचाराची तजवीज न करता, अपघाताची खबर नजीकच्या पोलीस ठाण्यास न देता अपघातस्थळावरुन वाहनासह पसार झाला. अशा मजकुराच्या मयताचा मुलगा- अभिजीत दत्तात्रय चव्हाण यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 134, 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

जनावरांचा मृत्यु, गुन्हा दाखल.

नळदुर्ग पोलीस ठाणे :  अणदुर येथील बाबु धोना राठोड यांचे शेत गडी- प्रभाकर पवार हे दि. 11 ऑगस्ट रोजी 11.00 वा. सु. अणदुर शिवारातील लंगडे तलावाच्या बांधावरुन जनावरे घेउन जात होते. यावेळी शेता शेजारील ग्रामस्थ युवराज, सोनुबाई, शिवाजी, कविता या चौघा राठोड कुटूंबीयांनी शेतात जनावरे आल्याच्या कारणावरुन पवार घेउन जात असलेल्या दोन बैलांना तलावाच्या पाण्यात ढकलल्याने ते बैल पाण्यात बुडून मरन पावले. यावरुन बाबु राठोड यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 429, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

 

 

 

 

 

 “मारहान.

ढोकी पोलीस ठाणे : समाधान विक्रम पुंड, रा. सारोळा (भि.), ता. उस्मानाबाद हे दि. 14 ऑगस्ट रोजी 09.30 वा. पारधी पिढी, पळसप येथील रस्त्याने जात होते. यावेळी पळसप वस्तीवरील- मधु पवार, सुनिल पवार व त्याचा भाउ अशा चौघांनी पुर्वीच्या वादावरून समाधान यांना अडवून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या समाधान पुंड यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 341, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

तामलवाडी पोलीस ठाणे : मसला (खु.), ता. तुळजापूर येथील राजेंद्र बळीराम शिंदे यांच्या शेत विहीरीतील गाळ शेजारच्या भारत शिंदे यांच्या शेतात पडत असल्याने भारत यांसह त्यांचा भाऊ- नितीन यांनी दि. 14 ऑगस्ट रोजी 10.00 वा. सु. राजेंद्र शिंदे यांना त्यांच्या शेतात शिवीगाळ करुन झाडाच्या फोकाने मारहान करुन चावा घेतला. यात राजेंद्र यांच्या गालावर मार लागुन त्यांचा एक दात निखळून पडल्याने ते जखमी झाले. अशा मजकुराच्या राजेंद्र शिंदे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 325, 504, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top