तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरासमोर मोफत शिवभोजन केंद्राचे उदघाटन.
तुळजापूर :- आज श्री तुळजाभवानी मंदिर समोर दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी तसेच शहरातील गोरगरीब जनतेसाठी जेवनाची मोफत सोय व्हावी म्हणुन महाराष्ट्र शासनाचे मोफत शिवभोजन केंद्र सुरू करण्यात आले . यावेळी वक्रतुंड ग्रुपचे अध्यक्ष सचिन कदम परमेश्वर याच्या हस्ते श्री तुळजाभवानीच्या प्रतिमेचे पुजन करून भाविकांना व जनतेला मोफत जेवन वाटप करण्यात आले . यावेळी शहराध्यक्ष राष्ट्रवादी काॅंग्रेस अमर नाना चोपदार,तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस संदिप गंगणे, क्रांती कदम परमेश्वर, आण्णासाहेब सोंजी, शैलेष लोमटे, कैलास मस्के, गोटन बिडकर, अभय चोपदार, वैजिनाथ कवडे, संतेश शिंदे, उपस्थित होते.
बातमी संकलन :- रुपेश डोलारे तुळजापूर