जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा : उमरगा -लोहारा तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम

0

जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे उपाध्यक्ष कैलास शिंदे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

उमरगा -लोहारा तालुक्यात विविध ठिकाणी सामाजिक उपक्रम

उमरगा  (महादेव पाटील)

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष तथा उमरगा भाजपचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे यांचा वाढदिवस उमरगा व लोहारा  तालुक्यात विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.  खंबीर नेत्रत्व कैलास शिंदे  यांचा वाढदिवस १५ आगस्ट रोजी होते. त्यांच्या असंख्य चाहत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून जागोजागी बॅनर तालुक्यात लावल्या आहेत. रविवारी  नेते कैलास शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उमरगा लोहारा  तालुक्यात ठीक ठिकाणी कार्यकर्त्यांनी आयोजन केले. दरम्यान वृक्षारोपणासह विविध सामाजिक उपक्रम घेवून साजरा करण्यात आला. 






    श्री कैलास शिंदे मंगल कार्यालयात वाढदिवसाच्या निमित्ताने रविवारी (१५) दिवसभर भारतीय जनता पार्टी, भाजपायुमो,भाजपा विद्यार्थी आघाडी, भाजप महिला आघाडी मोर्चा यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते, व्यापारी व मतदार संघातील विविध गावातील पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत कैलास शिंदे यांचा सत्कार करून अभिष्टचिंतन करण्यात आले. प्रारंभी दिग्विजय गॅस एजन्सी येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण श्री. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून अभिष्टचिंतन केले.यावेळी प्रदेश कार्यकारणी सदस्य संताजी चालुक्य, जिल्हा जेष्ठ नागरीक बाबुराव स्वामी, जिल्हा सरचिटणीस माधव पवार, व्यापारी महासंघाचे नितीन होळे, प्रविण स्वामी, संजय ढोणे, सरचिटणीस सिद्धेश्वर माने, अभिषेक पवार, पप्पु स्वामी, विठ्ठल चिकुंद्रे, देविदास चव्हाण, शिवाजी सुरवसे, एस पी कांबळे, प्रदिप सांगवे, गणेश डोंगरे, उमेश कारडामे यांच्यासह उमरगा-लोहारा तालुका येथील कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.






 जिल्हा परिषद समाजकल्याण सभापती दिग्विजय शिंदे, रत्नाकर सगर, राजू सरपे, हनुमंत दंडगुले, जयंत काळे, प्रताप पाटील, शांतकुमार मोरे, व्यंकट नावडे, तुकाराम बिराजदार, राजेंद्र झांबरे, मारुती जाधव, विठ्ठल जाधव, लक्ष्मण चव्हाण, ज्ञानेश्वर पाटील, दयानंद उमाटे, ईश्वर मुगळे, दयानंद कांबळे, अनिल केशवशेट्टी, संजय घोडके, सिराज मुगळे आदींनी वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दरम्यान मंगल कार्यालय परिसरात व सार्वजनिक ठिकाणी विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. यावेळी अजय पाटील, मल्लिनाथ कलशेट्टी, अशोक पतगे, दगडू भोसले, विजयकुमार झाकडे, बलराज हिप्परगे, प्रा मनोज गायकवाड, बालाजी गायकवाड, एस आर गायकवाड, श्री नागोरे, सतीश गायकवाड, दत्ता गायकवाड, प्रा एन एल गायकवाड यांच्यासह मित्रमंडळी उपस्थित होते.भारतीय जनता पार्टी उमरगा तालुका अध्यक्ष व डि. सी. सी बँकेचे व्हॉईस चेरमन कैलासजी शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी उमरगा व भारतीय जनता युवा मोर्चा उमरगा तर्फे सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top