तेरणा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांची नॅशनल क्रिकेट लीग साठी महाराष्ट्र संघामध्ये निवड - National Cricket League
( विद्यार्थ्यांच्या यशाने महाविद्यालयाच्या नावलौकिकात आणखीन भर !)
Osmnabadnews :(24.07.2023) तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालया मध्ये तृतील वर्षात शिकत असलेल्या विश्वजीत गणेश खोचरे याची नोएडा येथे होणाऱ्या नॅशनल क्रिकेट लीग साठी महाराष्ट्र संघामध्ये निवड झाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष श्री संताजी चालुक्य, तेरणा पब्लिकच्या चॅरिटेबल ट्रस्टचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा.गणेश भातलवंडे
तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने सर,क्रीडा विभागप्रमुख आर.एम.शेख सर यांच्यासमवेत संस्थेचे कर्मचारी व पदाधिकारी उपस्थित होते.
उस्मानाबाद येथील शासकीय तंत्रनिकेतन मधून आपले डिप्लोमा चे शिक्षण घेतल्यानंतर पुढील अभ्यासक्रमासाठी त्याने तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय धाराशिव येथे स्थापत्य अभियांत्रिकी च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेतल्यानंतर शैक्षणिक गुणवत्तेबरोबर क्रिकेट मध्ये देखील चांगली कामगिरी करून दाखवली आहे,यासाठी त्याला महाविद्यालयाने पूर्ण सहकार्य केले.
संस्थेचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह माने,क्रीडा विभागप्रमुख आर.एम.शेख यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळा संदर्भात योग्य ते मार्गदर्शन करीत असून विद्यार्थ्यांचा अंगी असणाऱ्या विविध गुणांना प्राधान्य देण्याचे काम देखील महाविद्यालय करीत आहे.
याबरोबरच भविष्यामध्ये त्याला एमपीएल,आईपीएल तसेच रणजी ट्रॉफी साठी विविध प्रकारच्या संधी असून महाविद्यालयाचा हा विद्यार्थी भविष्यात नक्कीच पुढे जाईल असे संस्थेच्या वतीने सांगण्यात आले