श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक प्रथम गळीत हंगामासाठी सज्ज.

0


उस्मानाबाद :  खामसवाडी येथे श्री सिध्दीविनायक परिवारातील श्री सिध्दीविनायक ग्रीनटेक इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कारखान्याचा रोलर पूजन समारंभ उत्साहात पार पडला.

कार्यक्रमासाठी खामसवाडी चे प्रथम नागरिक अमोल पाटील, भाजपा नेते संजय पाटील, तेरणा सहकारी कारखान्याचे माजी संचालक दिलीप पाटील, मोहेकर मल्टस्टेट चे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल मडके आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.

श्री सिध्दीविनायक परिवाराचे संस्थापक दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या हस्ते विधिवत पूजा करून रोलरचे पूजन करण्यात आले.
यावेळी बालाजी कोरे, प्रतिक देवळे, राहुल काकडे, सुजित साळुंके तसेच श्री सिध्दीविनायक परिवारातील अधिकारी, कारखान्यातील वाहतूक ठेकेदार, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top