Osmanabad जिल्ह्यात 4 ठिकाणी मारहाण : गुन्हा दाखल
बेंबळी: टाकळी (बें.), ता. उस्मानाबाद येथील अनिल राम सुर्यवंशी यांची मोटारसायकल गावकरी- दिपक धनाजी जगताप यांनी 5 वर्षांपुर्वी उधारीत विकत घेतली होती. ते पैसे परत करण्यास अनिल सुर्यवंशी यांनी दिपक जगताप यांच्याकडे तगादा लावला होता. अनिल सुर्यवंशी हे गावकरी- राजदिप व सचिन जगताप यांसह दि. 01.05.2021 रोजी 16.30 वा. सु. गावातील समाजमंदीरात बसले होते. यावेळी दिपक जगताप यांसह तीन अनोळखी व्यक्ती दोन मोटारसायकलवर तेथे आले. अनिल सुर्यवंशी हे मोटारसायकलचे पैसे मागत असल्याचा वाद उकरुन काढून दिपक जगताप यांनी अनिल सुर्यवंशी यांना शिवीगाळ करुन त्यांच्या डोक्याला पिस्तुल लावले असता दिपक सोबतच्या तीन अनोळखी व्यक्तींनी दिपक यांना चिथावणी दिली. दरम्यान अनिल सुर्यवंशी यांनी प्रसंगावधान राखुन दिपक यांच्या हाताला झटका दिल्याने पिस्तुलातील काडतूस जमीनीवर झाडले जाउन त्यातील छर्रे राजदिप व सचिन जगताप यांना लागून ते दोघे गंभीर जखमी झाले. झाडलेले रिकामे काडतुस बाजूला पडले असता दिपक जगताप याने उचलून घेतले व त्यानंतर सहकाऱ्यांसह त्याने घटनास्थळावरुन मोटारसायकलसह पलायन केले.
अशा मजकुराच्या अनिल सुर्यवंशी यांनी दि. 02.05.2021 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 326, 323, 107, 201, 504, 506, 34 सह शस्त्र अधिनियम कलम- 3, 25, 27 अंतर्गत बेंबळी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
लोहारा: उंडरगांव, ता. लोहारा येथील अमर व राहुल सुरेश सुर्यवंशी या दोघा बंधुंनी गावातील नातेवाईक- केशव हनुमंत सुर्यवंशी यांच्या आईच्या वाट्याची शेत जमीन कसण्याच्या कारणावरुन दि. 01 मे रोजी 21.00 वा. सु. केशव सुर्यवंशी यांसह त्यांचा मुलगा- अक्षय यांना त्यांच्या राहत्या घरासमोर शिवीगाळ करुन धारदार शस्त्राने मारहाण करुन गंभीर जखमी केले. अशा मजकुराच्या केशव सुर्यवंशी यांनी 02 मे दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 307, 324, 504, 506, 34 अंतर्गत लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
नळदुर्ग: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन नळदुर्ग, ता. तुळजापूर येथील शेख कुटूंबातील- मोहियोद्दीन, मुदस्सर, निजामोद्दीन यांसह इकबाल पटेल, रा. नागरसोगा, ता. लातूर यांचा फरहान शेख यांच्या कुटूंबातील फुरखॉन, इमाम यांच्याशी दि. 20.04.2021 रोजी रोजी 09.00 वा. सु. नळदुर्ग येथील कंदुरमाळा येथे वाद झाला. यात दोन्ही कुटूंबातील सदस्यांनी परस्परविरोधी कुटूंबीयांस शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, तलवार, लोखंडी गज, काठीने मारहाण करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या मोहियोद्दीन शेख व फरहान शेख यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत नळदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदवले आहेत.
ढोकी: पुर्वीच्या भांडणाच्या कारणावरुन पळसप, ता. उस्मानाबाद येथील लाकाळ कुटूंबातील- नामदेव, रोहन, रामलिंग, दयानंद यांच्या व गावकरी- दोन कुटूंबातील सुरज, विष्णु, सुशिल यांच्या गटाचा दि. 02.05.2021 रोजी रोजी 10.30 वा. सु. पळसप शेत शिवारात वाद झाला. यात दोन्ही गटांनी परस्परविरोधी गटांतील व्यक्तींनी शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, दगड, काठीने मारहाण करुन जखमी केलेव ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या नामदेव लाकाळ व सुरज दाने यांनी परस्परविरोधी दिलेल्या 2 प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत ढोकी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
अशी माहिती पोलिस प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत