चला रक्ताचे नाते जोडूया
नागूर येथे भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन
कनगरा/प्रतिनिधी
लोहारा तालुक्यातील नागूर येथे राज्यासह जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून राजमूद्रा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष प्रमोद चंदनशिवे यांच्या वाढदिवसानिमित्त व सह्याद्री ब्लड बॅंक,उस्मानाबाद यांच्या सहकार्याने गुरुवार दिनांक ०३ मे २०२१ रोजी सकाळी ९ ते ३ वाजजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबीरात गावातील युवकांनी उत्स्फुर्त प्रतिसाद नोंदवला होता.
सदर रक्तदान शिबीरात रक्तदान करणार्या रक्तदात्यांना आयोजक प्रमोद चंदनशिवे यांच्या हास्ते प्रमाणपञ व २ लिटरचा प्रेशर कुकर भेट म्हणून देण्यात आला.
यावेळी राजमुद्रा प्रतिष्ठान नागुरचे अध्यक्ष प्रमोद चंदनशिवे,शुभम पाटील, दीपक सलगरे, प्रशांत मोरे ,रोहित जावळे , अॅड.शुभम जावळे पाटील , आकाश जावळे , बाला सलगरे, अक्षय जाधव , अक्षय ढोणे ,राजेंद्र मोरे ,शुभम जावळे, सागर जाधव , उमेश साठे , सुनील जाधव,हरि मोरे,संतोष जाधव,तानाजी पाटील,विक्रम पवार, आदिंची उपस्थिती होती.रक्तदान शिबीराचे आयोजन नागनाथ मंदिर,नागूर येथे करण्यात आले होते.राजमुद्रा प्रतिष्ठाणने राबवलेल्या अशा या सामाजिक उपक्रमाचे सर्वञ कौतुक होत आहे.