Osmanabad जिल्ह्यात ठरवून दिलेली वेळ न पळता दुकाने जास्त वेळ सुरू ठेवणाऱ्या 80 दुकानांवर जिल्हा प्रशासनाची कारवाई!

0
Osmanabad  जिल्ह्यात ठरवून दिलेली वेळ न पळता दुकाने जास्त वेळ सुरू ठेवणाऱ्या 80 दुकानांवर जिल्हा प्रशासनाची कारवाई!

उस्मानाबाद: दिनांक 1 व 2 मे  2021 रोजी महसूल प्रशासनाकडून उस्मानाबाद जिल्ह्यात आदेशाचा अवमान करुन दुकाने उघडी ठेवणाऱ्या 80 दुकानदारांवर कारवाई करण्यात आली व त्यांची दुकाने सील करण्यात आली. तसेच त्यांच्याकडून दंडात्मक रक्कम देखील वसूल केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात 15 मे पर्यंत कडक निर्बंध लागू करण्यात आले आहे. त्यानुसार सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंतच अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी आहे मात्र काही दुकाने नियमांचे पालन न करता आपली दुकाने उघडी ठेवतात. त्या अनुषंगाने ही कारवाई जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आली आहे.

आजपावेतो सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्या 3331 नागरिकांकडून रुपये 10 , 90,500 दंड वसूल करण्यात आलेला आहे. तसेच शॉपिंग मॉल , मंगल कार्यालये , रेस्टॉरंट , धार्मीक स्थळे व इतर सार्वजनिक ठिकाणच्या 1177 दुकानांनी / आस्थापनांनी आदेशाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांचेकडून रुपये 4,74,578
₹ इतका दंड वसूल करण्यात आला आहे. अशी माहिती उस्मानाबाद जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
 
काही व्यवसायिक त्यांची दुकाने दिलेल्या निर्धारीत वेळेपेक्षा जास्त वेळ उघडी ठेवून त्यांचे व नागरीकांचे देखील आरोग्य धोक्यात आणत आहेत. तसेच सर्व जनतेने कोरोना विषाणूचा प्रसार होवू नये म्हणून प्रशासनाने दिलेल्या सर्व सुचनांचे तंतोतंत पालन करावे व प्रशासनास सहकार्य करावे.  असे आवाहन देखील जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top