google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी

शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी

0
शेतकरी व रोजगारासह धाराशिवच्या विकासला प्राधान्य देणारा अर्थसंकल्प - दत्ताभाऊ कुलकर्णी

धाराशिव - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला २०२६-२७ चा अर्थसंकल्प सर्वसामान्य, शेतकरी व युवकांना दिलासा देणारा आहे. पीक कर्जमाफीसाठी करण्यात आलेली तरतूद, वेळेवर कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभ तसेच सौर ऊर्जा योजनेमुळे दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना मोठा आधार मिळणार आहे. तसेच रोजगारनिर्मितीच्या दृष्टीने राज्यात मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबविण्याचा निर्णय युवकांसाठी संधी निर्माण करणारा आहे. याबरोबरच महिलांसाठी सुरू असलेल्या योजनांचा लाभ पुढेही सुरू राहणार असल्याने कुटुंबांच्या आर्थिक स्थैर्याला मदत होईल, तसेच मराठवाड्यात औद्योगिक विकासासाठी करण्यात आलेल्या तरतुदींमुळे धाराशिवसारख्या जिल्ह्यांमध्ये उद्योग व रोजगार वाढण्यास चालना मिळेल, असा विश्वास भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे व्यक्त केला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top