राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी सुरेश पाटील यांची नियुक्ती

0

राष्ट्रवादी काँग्रेस च्या प्रदेश सरचिटणीस पदी सुरेश पाटील यांची नियुक्ती 

उस्मानाबाद ,( osmanabad news ) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रदेश चिटणीस सुरेश पाटील यांची प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचे पत्र शुक्रवारी (ता 21) प्रदेश कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सुरेश पाटील यांना देण्यात आले. 

     कसबे तडवळे येथील एस पी शुगर चे चेअरमन सुरेश पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मध्ये प्रदेश चिटणीस कार्यरत होते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोडून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत मोठी पोकळी निर्माण झाली होती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये निर्माण झालेली पोकळी प्रदेश चिटणीस  पाटील यांच्या रूपाने भरून निघाली होती व जिल्ह्यामध्ये अजित पवार यांचे सर्वात निकटवर्तीय म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती जिल्ह्यात त्यांनी पक्ष वाढीचे मोठे कार्य केले होते अजित पवार गट स्थापन होताच जिल्हा मध्ये सर्वात प्रथम सुरेश पाटील यांनी अजित पवार गटाला पाठिंबा दिला होता. 

      सुरेश पाटील यांनी प्रदेश चिटणीस कार्यकाळात केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढी संदर्भातील कार्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेश चिटणीस पदावून थेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) प्रदेश सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे याबाबतचे पत्र शुक्रवारी प्रदेश कार्यालयात अजित पवार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते सुरेश पाटील यांना देण्यात आले यावेळी जिल्हा परिषद चे माजी सदस्य प्रा. ज्ञानेश्वर गीते, माजी सभापती नवनाथ जगताप, गोकुळ शिंदे (तुळजापूर) नळदुर्ग चे माजी नगराध्यक्ष शफी शेख प्रा. सुशील शेळके (कळब) ऍड सूर्यकांत सांडसे (भुम) आदी मान्यवर उपस्थित होते. 


फोटोत प्रदेश सरचिटणीस पदाच्या नियुक्तीचे पत्र सुरेश पाटील यांना देताना अजित पवार, सुनील तटकरे सोबत गोकुळ शिंदे प्राध्यापक ज्ञानेश्वर गीते नवनाथ जगताप सूर्यकांत सांडसे सुशील शेळके व इतर दिसत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top