तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी नवमतदारांचे अर्ज घेतले भरुन , New voter registration

0



तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी नवमतदारांचे अर्ज घेतले भरुन , New voter registration

 

उस्मानाबाद,दि.21( osmanabad news ): भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार 21 जुलै पासून घरोघरी जाऊन मतदार नोंदणी, नाव दुरुस्ती किंवा बाहेरगावी राहणारे किंवा मृत्यु झालेल्यांची नावे वगळणे आदी कार्यक्रम पुढील एक महिनाभर चालणार आहे. मतदार यादी शुध्दीकरणाचा कार्यक्रम बाबत सर्व तालुक्यात प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला आहे.

आज या निमित्ताने तहसीलदार डॉ.शिवानंद बिडवे यांनी शहरातील उंबरे कोठा येथील नागरिकांच्या घरी जाऊन तेथील नवमतदार आणि महिला मतदारांना मतदान ओळखपत्राचे अर्ज भरुन घेतले. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी तारेक काझी,मतदार नोंदणी अधिकारी राम मुंडे आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top