मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सावानिमित्त खर्च व आराखडा बैठक संपन्न

0


मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सावानिमित्त खर्च व आराखडा  बैठक संपन्न

उस्मानाबाद,दि,21( osmanabad news ):- 17 सप्टेंबर 2023 रोजी मराठवाडा मुक्ती संग्रामास ७५ वर्षे पूर्ण होत असून अमृत महोत्सव वर्ष साजरे करण्याच्या अनुषंगाने  विविध कार्यक्रमाचे आयोजन करणे व स्मृती स्मारक उभारण्यासाठी खर्च व आराखडा याची पूर्व तयारी बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांचे अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता,अप्पर जिल्हाधिकारी शिवाजी शिंदे, निवासी उपजिल्हा अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, जिल्हा शल्य चिकित्सक  डॉ. राजाभाऊ गलांडे, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संतोष भोर, उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे,तसेच सर्व तहसीलदार, माध्यमिक, प्राथमिकच्या जिल्हा शिक्षणाधिकारी,गट विकास अधिकारी आदी मान्यवर उपस्थित  होते.

जिल्हाधिकारी म्हणाले जिल्ह्याला अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी दोन कोटी रुपय निधी मंजूर  असून या निधीतून जिल्ह्यात स्मृती स्मारके स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार व अनुभव कथन,तालुकास्तरावर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनकरणे,तालुकास्तरावर देशभक्तीपर गीते नाटिका पथनाटय इ.कार्यक्रमांचे आयोजन करणे,मुक्तीसंग्रामाशी संबंधित छायाचित्रे, पोस्टर्स, भित्तीपत्रके,वस्तू, पुस्तके इत्यादीचे प्रदर्शन भरविणे, तसेच रांगोळी स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून याकरिता निधी वितरण करण्यात आला आहे,

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top