उस्मानाबाद जिल्ह्यातील नागरिकांना जिल्हाधिकारी यांच्याकडून रमजानच शुभेच्छा उस्मानाबाद न्यूज च्या माध्यमातून सर्वांना दिल्या आहेत.
Osmanabad : जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यात कोविड-19 वाढता प्रादुर्भाव पाहता 8 मे ते 13 मे रोजी सकाळी 7 वाजले पर्यंत पाच दिवसाचे जनता कर्फ्यू लागू केले होते त्यामध्ये मेडिकल दवाखाने वगळता इतर सर्व दुकाने अस्थापना बंद करण्यात आले होते मात्र रमजान ईद निमित्त अनेक संघटनांनी व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मसूद शेख यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे रमजान ईदच्या निमित्ताने जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी जनता कर्फ्यू मधुन सुट द्यावी असे निवेदन दिले होते याच अनुषंगाने जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्यातील नागरिकांना बुधवार व गुरुवार रोजी जनता कर्फ्यू तुन थिथील ता देत जिल्ह्यातील अत्यावश्यक वस्तूंची दुकाने बुधवार व गुरुवारी या दोन रोजी सकाळी सात ते अकरा या वेळेत कोविड-19 च्या अनुषंगाने प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करत अत्यावश्यक सेवेतील दुकाने सुरू ठेवण्याचे मुभा आदेश दिले आहेत.
रमजान ईद असल्याने 12 मे पासून जिल्ह्यात जीवनावश्यक सेवा दुकाने सकाळी 7 ते 11 या वेळेत सुरू राहतील तर सर्व पेट्रोल पपं हे 7 ते 11 वेळेत सूरु राहतील तर सर्व बँका या सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत सुरू राहणार आहेत असे जिल्हाधिकारी यांनी आदेशीत केले आहे त्यामुळे किराणा, बेकरी , भाजी पाला ,फळ दुकाने 12 मे पासून सुरु होणार आहेत.
ईद नंतर पुन्हा कडक निर्बंध लावावे लागणार आहेत असे देखील जिल्हाधिकारी यांनी माहिती दिली आहे.