पाटोदा गावचे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांचा आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार

0

पाटोदा गावचे माजी सरपंच श्री भास्करराव पेरे पाटील यांचा आमदार कैलास पाटील व खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते सत्कार


तुळजापूर :- 
देशातील एक आदर्श गाव घडवून इतरांसाठी प्रेरणा ठरलेले पाटोदा जि . औरंगाबाद या आदर्श गावचे माजी सरपंच श्री. भास्करराव पेरे पाटील यांची खासदार मा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर , व कळंब-उस्मानाबाद आमदार कैलास पाटील यांनी तुळजापूर येथे सदिच्छा भेट घेऊन सत्कार केला. 

जबाबदारीची जाणीव, कर्तव्याप्रती निष्ठा आणि प्रामाणिक प्रयत्न करून ग्रामीण भागाच्या विकासाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतीचा कशा पद्धतीने काया पालट करता येतो याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे अशी प्रतिक्रिया आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केली आहे

यावेळी माजी उपजिल्हाप्रमुख शाम पवार, उपतालुकाप्रमुख सुनिल जाधव, उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, पंचायत समिती सदस्य गजेंद्र जाधव, युवासेना तालुकाप्रमुख प्रतिक रोचकरी, प्रतिक नाईकवाडी, सोशल मिडिया तालुकाप्रमुख चेतन बंडगर, सागर इंगळे, अर्जुन साळुंके, पिनू भोसले आदी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top