बेंबळी येथील अनिल दाणे, परशुराम करवतकर व आंबेवाडीचे राहुल राऊत यांचा आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश
उस्मानाबाद :- तालुक्यातील बेंबळी येथील अनिल दाणे, परशुराम करवतकर व आंबेवाडीचे राहुल राऊत यांनी आमदार कैलास पाटील यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात प्रवेश केला. यावेळी सर्वांचे स्वागत करून आगामी कारकिर्दीसाठी आमदार कैलास पाटील यांनी शुभेच्छा दिल्या.
अनिल दाणे, परशुराम करवतकर यांच्या प्रवेशाने बेंबळी आणि राहुल राऊत यांच्या प्रवेशाने आंबेवाडी गावात पक्षाला अधिकाधिक बळकटी मिळेल, पक्षात त्यांना सन्मानपूर्वक वागणूक दिली जाईल, असा विश्वास आमदार कैलास पाटील यांनी व्यक्त केला.
यावेळी युवासेना उपतालुकाप्रमुख किरण चव्हाण, समाधान जाधव, प्रितम जाधव, अतिक सय्यद, मोहम्मद शेख तसेच पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.