google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद शहरातील हजरत उमर चौक यंग ग्रुपचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

उस्मानाबाद शहरातील हजरत उमर चौक यंग ग्रुपचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

0


उस्मानाबाद शहरातील हजरत उमर चौक यंग ग्रुपचा काँग्रेस पक्षात प्रवेश..

उस्मानाबाद शहरातील हजरत उमर चौक यंग ग्रुप ने काँग्रेस पक्षात आज जाहीर प्रवेश केला.
हजरत उमर चौक, ख्वाजा नगर या ठिकाणी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष विश्वासराव अप्पा शिंदे यांच्या हस्ते ग्रुपचे अध्यक्ष आरेफ मुलाणी, मसूद शेख, फरीद पिरजादे, मुख्तदीर शेख, अरबाज शेख, कासीम मुलाणी, तौफिक शेख व सहकाऱ्यांचे काँग्रेस पक्षात स्वागत करण्यात आले.


यावेळी काँग्रेसचे संघटक राजाभाऊ शेरखाने, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत पाटील, सरचिटणीस .ॲड. जावेद काझी, शहराध्यक्ष अग्निवेश शिंदे, जमेत-उल-कुरेश चे अध्यक्ष हाजी उस्मान कुरेशी, माजी नगराध्यक्ष विजय मुद्दे, शहर कार्याध्यक्ष अलीम शेख, सचिव सय्यद फारूक हुसेन, मागासवर्गीय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रभाकर लोंढे, देवानंद येडके, सुरेंद्र पाटील, अजहर पठाण, बालाजी नायकल, कफिल सय्यद, नियामत मोमीन, इम्रान हुसैनी यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.जावेद काझी यांनी केले. सूत्रसंचालन प्रभाकर लोंढे यांनी केले तर आभार अलीम शेख यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top