उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे संयुक्त पंचनामे सुरू

0

उस्मानाबाद तालुक्यातील सारोळा येथे संयुक्त पंचनामे सुरू


उस्मानाबाद: तालुक्यातील सारोळा (बुद्रूक) येथे महसूल व ग्रामसेवक यांच्या वतीने संयुक्त पंचनामे करण्यास शुक्रवारी (दि.१) प्रारंभ करण्यात आला आहे.
मंडळ अधिकारी दत्ता कोळी, तलाठी व्ही. व्ही. वायचळ, कृषी सहाय्यक (सारोळा) श्री मगर, श्री. कोळी (बालपीरवाडी) व ग्रामसेवक वाय. बी. मुंढे यांच्याकडून पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच प्रशांत रणदिवे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांची बैठक घेवून तातडीने पंचनामे करण्याबाबत चर्चा केली. गावातील अजित बाबुराव चंदणे यांच्या शेतातून पंचनामे करण्यास सुरूवात करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले, अनिल चंदणे, प्रविण चंदणे, पोलीस पाटील प्रितम कुदळे, संदीप रणदिवे, बबलू रणदिवे, ज्योतिराम रणदिवे, सतीश माळी, सच्चिदानंद रणदिवे आदींसह शेतकरी उपस्थित होते.  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top