धाराशिव ता. 30: युवा सेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे यांनी काही दिवसापूर्वी शिंदे गटात प्रवेश केला होता. मात्र काही दिवसातच ते पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात परतले आहेत.
वंदनीय हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत भगव्या विचारांनी प्रेरित होऊन, पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार व युवासेनाप्रमुख आदित्यजी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली, जिल्ह्याचे खासदार मा. श्री. ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील संपर्कप्रमुख सुनील काटमोरे, सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख तथा आमदार कैलास पाटील यांच्या हस्ते निलेश शिंदे यांनी शिंदे गटातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश घेतला.
मागील महिन्यात पालकमंत्री यांच्या हस्ते निलेश शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. परंतु एक महिन्यात त्यांनी घरवापसी केली.शिंदे गटात कार्यकर्ते यांना विश्वासात न घेता काम केलं जात आहे.चांगली वागणूक दिली जात नाही.,प्रवेश घ्यायचं अन माणसं वाऱ्यावर सोडायची अशी पद्धत तिथं रुजवली जात आहे. पक्षात कार्यकर्ते कमी व नेत्यांची भरती अधिक असून कोणीच कोणाचं नेतृत्व मान्य करायला तयार नाही.कार्यकर्त्याची साधी विचारपूस देखील केली जात नसल्याच चित्र आहे. ,शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष परिवार म्हणून मला परत यावं वाटलं असं मत निलेश शिंदे यांनी व्यक्त केल. तेव्हा आमदार पाटील यांनीही त्यांचं स्वागत करून पुन्हा जोमाने कामाला लागावे असे आवाहन केले. कार्यकर्ते हीच पक्षाची शक्ती असून सध्या पक्षातील कार्यकर्त्याना महायुतीच्या नेत्याकडून चुचकरण्याचे सर्व प्रयत्न केले जात आहेत. अश्या वातावरणातही पक्षनिष्ठा ठेवत कार्यकर्ते प्रामाणिक काम करत आहेत, अश्या कार्यकर्त्यांच्या सोबत पक्ष देखील तितक्याच ताकदीने उभा राहील असा विश्वास आमदार पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, शिवसेना शहरप्रमुख व नगरपालिकेचे माजी गटनेते सोमनाथ गुरव, माजी नगरसेवक राणा बनसोडे आदी उपस्थित होते .