उस्मानाबाद जिल्ह्यात सहा ठिकाणी अवैध मद्य विरोधी कारवाई.
उस्मानाबाद जिल्हा : अवैध मद्य विक्रीच्या गोपनीय खबरेवरुन उस्मानाबाद जिल्हा पोलीसांनी काल दि. 21.11.2021 रोजी एकुण 6 ठिकाणी छापे मारले. या दरम्यान छाप्यातील हातभट्टी निर्मीतीचे द्रावण जागीच ओतून नष्ट केले तर अवैध मद्य जप्त करुन संबंधीत व्यक्तींविरुध्द महाराष्ट्र मद्य निषेध कायद्यांतर्गत पुढील प्रमाणे 6 गुन्हे नोंदवले आहेत.
1) लोहारा पोलीसांनी 2 ठिकाणी छापे मारले असता जेवळी (उत्तर) ग्रामस्थ- छबुबाई चंद्रकांत पुजारी या आपल्या घरामागील मोकळ्या जागेत एका कॅनमध्ये 10 लि. हातभट्टी दारु बाळगलेल्या तर कानेगाव ग्रामस्थ- बालाजी रुद्रबुवा भारती हे आपल्या घरासमोर 180 मि.ली. क्षमतेच्या देशी दारुच्या 15 बाटल्या बाळगलेले आढळले.
2) उपविभागीय पोलीस अधिकारी, उमरगा यांच्या पथकास शंकर टेकाळे, रा. लोहारा (खुर्द) व रमेश गोरे, रा. नागराळ हे दोघे लोहारा येथील जेवळी रस्त्यालगत एका दुकानाजवळ 49 लि. शिंदी हे अंमली द्रव बाळगलेले आढळले.
3) उमरगा पोलीसांना डिग्गी, ता. उमरगा ग्रामस्थ- संजय वामन सुर्यवंशी हे गाव परिसरात एका प्लास्टीक घागरीमध्ये 14 लि. हातभट्टी दारु बाळगलेले आढळले.
4) शिराढोन पोलीसांना मंगरुळ, ता. कळंब ग्रामस्थ- सिध्देश्वर संभाजी गायकवाड हे मंगरुळ फाटा येथील एका हॉटेलमागे 180 मि.ली क्षमतेच्या देशी दारुच्या 7 बाटल्या बाळगलेले आढळले.
5) परंडा पोलीसांना वाकडी, ता. परंडा ग्रामस्थ- तानाजी काळे हे आपल्या घरासमोर हातभट्टी मद्य निर्मीतीचे सुमारे 90 लि. गुळ- पाणी मिश्रणाचे आंबवलेले द्रावण तीन प्लास्टीकच्या पिंपामध्ये बाळगलेले आढळले.
(वरिल वाकडी येथील मद्य विरोधी छाप्याचे छायाचित्र आहे )