उस्मानाबाद जिल्ह्यात २ ठिकाणी अपघात , वाशीत मारहाण गुन्हे दाखल

0




Osmanabad news ;- 

उस्मानाबाद जिल्ह्यात 2 ठिकाणी अपघात , वाशीत मारहाण गुन्हे दाखल


अपघात.

बेंबळी पोलीस ठाणे : कोंड, ता. उस्मानाबाद येथील नाना गंपु जाधव, वय 33 वर्षे हे दि. 16.02.2022 रोजी 12.00 वा. सु. गावातील नितळी रस्त्याकडेने पायी चालत जात होते. यावेळी अज्ञात चालकाने मोटारसायकल क्र. एम.एच. 24 बीबी 9917 ही निष्काळजीपने चालवल्याने नाना जाधव यांना पाठीमागून धडकल्याने ते गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या शिल्हा नाना जाधव, रा. कोंड यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) सह मो.वा.का. कलम- 184 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

लोहारा पोलीस ठाणे : भातांगळी, ता. लोहारा येथील सुरज राम पवार, वय 30 वर्षे हे दि. 27.02.2022 रोजी पहाटे 04.00 वा. सु. गावातील इंद्रजीत हजारे यांच्या शेत गट क्र. 156/3/2 मध्ये ऊस भरण्यासाठी ट्रक आल्याने सुरज पवार हे ट्रक क्र. एम.एच. 24 जे 8407 च्या बाजूचे पडलेले ऊस गोळा करत होते. यावेळी नमूद ट्रक चालक- चंद्रकांत माणिकराव शिंदे, रा. लातुर यांनी निष्काळजीपने चालवल्याने ट्रकसमोरील ऊस गोळा करणारे सुरज पवार यांना धडकला. या अपघातात सुरज पवार हे गंभीर जखमी होउन मयत झाले. अशा मजकुराच्या मयताचा भाऊ- अनंत राम पवार यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 279, 304 (अ) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

 

मारहान.

वाशी पोलीस ठाणे : पिंपळगाव (क.), ता. वाशी येथील बंकटराव रामभाउ आटोळे यांसह त्यांची पत्नी- शकुंतला, मुलगा- बालाजी, सुन- छाया या सर्वांनी शेत विहीरीतील पाणी वाटणीच्या कारणावरुन दि. 01.03.2022 रोजी 10.00 वा. सु. पिंपळगाव (क.) शिवारात नमूद चौघांनी दुसरा मुलगा- धनंजय बंकटराव आटोळे यांना शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी, लोखंडी नळी, काठीने मारहान करुन जखमी केले व ठार मारण्याची धमकी दिली. अशा मजकुराच्या धनंजय आटोळे यांनी दि. 02.03.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 324, 323, 504, 506, 34 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

                                     

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top