अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू

0

अल्पसंख्याक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कर्ज योजनेतर्गत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू

 

Osmanabad news : 

  उस्मानाबाद,दि.19(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या अल्पसंख्याक विकास  विभागांतर्गत  असलेल्या येथील मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळामार्फत   अल्पसंख्याक समुदायातील अर्थात मुस्लिम,ख्रिचन,बौध्द,जैन,पारसी,शिख,ज्यू  धर्मीय विद्यार्थीच्या उच्च शिक्षणाकरिता प्रामुख्याने  मेडिकल,इंजिनिअरिंग,एमबीए, फार्मसी  आदी अभ्यासक्रमांसाठी  2022-23 या शैक्षणिक वर्षाकरिता कर्ज योजनेत अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरू आहे, पात्र लाभार्थ्यांनी अर्ज करावावेत , असे आवाहन महामंडळाच्या व्यवस्थापकांनी केले आहे.

                  या योजनेसाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी अधिक माहिती करीता  www.malms.maharashtar.gov.in  या संकेत स्थळाचा वापर करावा अथवा महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाशी संपर्क  साधावा  . जिल्हा कार्यालयाचा पत्ता- मातोश्री क्लिनिक बिल्डिंग(डॉ.गपाट), पहिला मजला,पोलीस लाईन समोर मेन रोड,उस्मानाबाद. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहन प्र.जिल्हा व्यवस्थापक रिजवान पठाण यांनी केले अहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top