लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम संपन्न
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा शहरातील भानुदासराव चव्हाण महाविद्यालयात लोहारा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने दि.21 ऑगस्ट 2022 रोजी गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच नागन्ना वकील हे होते. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव दिग्विजय शिंदे, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, उमरगा लोहारा विधानसभा अध्यक्ष विजय लोमटे, राष्ट्रवादी दिव्यांग सेलचे जिल्हाध्यक्ष प्रदीप डोके, गोविंदराव साळुंके यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. बालाजी जाधव म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शालेय जीवनात चिकित्सक वृत्ती अंगिकारून अभ्यास केला पाहिजे. तसेच अभ्यासात सातत्य ठेवून यश संपादन केले पाहिजे. तुम्ही शिक्षण घेऊन मिळविलेल्या पदाचा उपयोग आपल्या भागातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी करावा असे आवाहन त्यांनी यावेळी बोलताना केले.
यावेळी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार म्हणाले की, विद्यार्थ्यांनो शिक्षण घेत असताना कुठेही कमी पडू नका. शिक्षण घेत असताना परिश्रम करा असे आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर म्हणाल्या की, मुलींनो शिक्षण घेत असताना संघर्ष करावा लागत असतो. त्यामुळे न डगमगता संघर्ष करावा. कारण ज्यावेळी संघर्ष करावा लागतो त्या संघर्षानंतर मिळालेले यश हे खूप मोठे असते असेही त्या म्हणाल्या. या कार्यक्रमात तालुक्यातील 23 शाळेतील दहावी परीक्षेत शाळेतून प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या एकूण 46 गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
तसेच बारावी परीक्षेत तालुक्यात प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष आयुब शेख, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा शरिफा सय्यद,किसान सेलचे तालुकाध्यक्ष माधवराव पाटील, तालुका कार्याध्यक्ष अमोल ओवंडकर, नगरसेवक जालिंदर कोकणे, हाजी बाबा शेख, ऍड. दादासाहेब जानकर, जिल्हा कोषाध्यक्ष जगदीश पाटील, प्रकाश भगत, शमशोद्दीन जमादार, अफसर मुल्ला, युवकचे जिल्हा उपाध्यक्ष दादा पाटील, महेश स्वामी, प्रवीण पाटील, दयानंद स्वामी, नागुरचे सरपंच गजेंद्र जावळे, माकणीचे उपसरपंच वामन भोरे, वैजिनाथ कागे, प्रशांत कार्ले, भूकंपग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष अमर बिराजदार, गजानन मिटकरी, लक्ष्मण बिराजदार, व्यंकट राजपूत, यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तालुकाध्यक्ष सुनील साळुंके व सूत्रसंचालन परमेश्वर सूर्यवंशी यांनी केले तर आभार विजय लोमटे यांनी मानले.