१३ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान राबविण्यासाठी लोहारा नगरपंचायतच्यावतीने जनजागृती
लोहारा/प्रतिनिधी
लोहारा नगरपंचायतीच्या वतीने शहरामध्ये स्वातंत्र्याचा 75 व्या अमृत महोत्सव वर्ष निमित्त हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणात राबविण्यासाठी लोकसहभाग वाढावा, यासाठी सर्व शाळा माहविदयालय, कॉलेज चे मुख्याध्यापक प्राचार्य व शहरातील डॉक्टर, मेडीकल असोसिएशन चे प्रतिनिधी, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते यांची बैठक घेऊन जनजागृती करण्यात येत असल्याची माहिती नगराध्यक्षा सौ.वैशाली अभिमान खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी दि.2 ऑगस्ट 2022 रोजी पत्रकार परिषदेत दिली. नगरपंचायत वतीने झेंडा मोफत वाटप करण्याचा निर्णय नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला आहे. शहरामध्ये दिनांक 10 ऑगस्ट पासुन ध्वज मोफत देण्यात येणार आहेत,
तसेच शहरामध्ये 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट हर घर तिरंगा अभियान यशस्वी होण्यासाठी विदयार्थी यांचे समवेत प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले आहे. ध्वजाचा योग्य सन्मान राखुन ध्वज फडकावण्याचे आवाहन नगराध्यक्षा सौ.वैशाली खराडे, उपनगराध्यक्ष आयुब शेख, मुख्याधीकारी गजानन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. यावेळी स्वच्छता निरीक्षक अभिजीत गोरे, नगरसेवक जालिंदर कोकणे, आदि, उपस्थित होते.