google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 एमडीएस परिक्षेत डॉ. शामली गिरवलकर विशेष प्राविण्यासह उत्तिर्ण

एमडीएस परिक्षेत डॉ. शामली गिरवलकर विशेष प्राविण्यासह उत्तिर्ण

0

एमडीएस परिक्षेत डॉ. शामली गिरवलकर विशेष प्राविण्यासह उत्तिर्ण...

उस्मानाबाद :  तालुक्यातील बेंबळी येथील डॉ. शामली नागेश गिरवलकर यांनी एमडीएस परिक्षेत विशेष प्राविण्यासह यश मिळवले असून ऑगस्ट २०२२ मध्ये या परिक्षा घेण्यात आल्या होत्या.

डॉ. गिरवलकर यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा येथील तात्यासाहेब कोरे डेंटल कॉलेज येथून बीडीएस पदवी प्राप्त केली. यामध्येही त्यांनी विशेष प्राविण्य मिळवले होते. त्यानंतर याच महाविद्यालयात त्यांना एमडीएस अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळाला.

 ऑर्थाेडोन्टीक्स अॅन्ड डेन्टोफॅकल, ऑर्थोपॅडिक्स या पदयुत्तर पदवीच्या अभ्यासक्रमात त्यांनी यश मिळवले आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षण बेंबळीतील सरस्वती प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे तर माध्यमिक शिक्षण लातूरच्या देशीकेंद्र विद्यालयात झाले आले. दहावी व बारावीच्या परिक्षेतही त्यांनी उत्तुंग यश मिळवले. त्यांचे आजोबा सेवानिवृत्त अभियंता रामलिंगाप्पा गिरवलकर  यांच्यासह त्यांच्या नातेवाईकांनी डॉ. शामली गिरवलकर यांचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top