google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन

0

तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन


उस्मानाबाद  -
महाराष्ट्रातील ऊसतोड कामगारांची  नोंदणी करण्याचे ऊसतोड कामगार प्रणित जिल्यातील मा. सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी महोदय यांना विनाविलंब आदेश व्हावे, आणि विविध कल्याणकारी योजना मिळवून दयावी तसेच सन 2021-22 या गाळप हंगामातील साखर कारखान्याकडील आणि राज्य शासनाकडील प्रत्येकी प्रति टन देण्यात येणारे 10 रुपये शेष फंडाची संपूर्ण रक्कम गोपीनाथ मुंडे ऊसतोड महामंडळाकडे त्वरित मिळवून देण्यासाठी, कारखाना स्तरावर अपघाती मृत्यू पावलेल्या ऊसतोड कामगाराच्या वारसदारांना प्रत्येकी दहा लाख रुपयाची आर्थिक मदत मिळावी अशी मागणी तुळजाभवानी कामगार संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.


ऊसतोड कामगारांच्या मुला मुलीसाठी उच्च दर्जाचे शिक्षण घेण्यासाठी, त्यांचे जीवन उज्वल करण्यासाठी, त्यांचे राहणीमान उंचावण्यासाठी, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी,उस्मानाबाद, लातूर, नांदेड,हिंगोली, परभणी,जालना, औरंगाबाद, जळगाव, नागपूर,पुणे,मुंबई,  या जिल्ह्यातील महत्त्वाच्या तालुक्याच्या ठिकाणी श्री संत भगवान बाबा शासकीय वस्तीग्रह मिळवून देण्याच्या विविध मागणीचे निवेदन देण्यात आले.

निवेदन देताना महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या श्रीमती संगीता चव्हाण, संघटनेचे संस्थापक अध्यक्ष श्री सुरेश पवार, प्रदेश उपाध्यक्ष श्री.संदीप पवार, औरंगाबाद जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष श्री राजेंद्र पवार, उस्मानाबाद जिल्हा अध्यक्ष श्री.संतोष राठोड, उमरगा तालुका अध्यक्ष  श्री.प्रताप राठोड, तुळजापूर तालुक्याचे पदाधिकारी संजय पोमा पवार, देवजी पवार, संजय पवार, अविनाश चव्हाण, रमेश प्रमोद चव्हाण, निवेदनावर आदिच्याच्या  स्वाक्षऱ्या आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top