google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 लेडीज क्लब आयोजित दांडिया महोत्सवामध्ये , नागरिकांची मोठी गर्दी

लेडीज क्लब आयोजित दांडिया महोत्सवामध्ये , नागरिकांची मोठी गर्दी

0



उस्मानाबाद : लेडीज क्लब आयोजित दांडिया महोत्सवामध्ये प्रसिद्ध अभिनेत्री मानसी नाईक यांनी आपल्या सौंदर्याने व दिल खेच अदांनी  उस्मानाबाद करांना मंत्रमुग्ध केले. आपल्या अनोख्या स्टाईल मध्ये राम राम ठोकताच टाळ्या व शिट्ट्यांचा कडकडाट झाला. 'मैफिलीला घ्या माझा मुजराया गाण्याने सुरुवात करून  युवक युवतींना आपल्या तालावर थिरकायला भाग पाडले.

 

महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या आरतीने लेडीज क्लब आयोजित दांडिया महोत्सवाची सुरुवात केली. यावेळी आमदार राणाजगजितसिंह पाटीलभाजपा जिल्हाध्यक्ष नितीन काळेलेडीज क्लब अध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. 

 

युवक युवतींना दांडिया खेळण्यासाठी लेडीज क्लब च्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे.  उस्मानाबादकरांसाठी ही मोठी पर्वणीच आहे. त्यातच मानसी नाईक सारख्या लावण्यवतीला यात सहभागी करून शहरवासीयांचा आनंद द्विगुणित केला आहे. मोठ्या शहरांमध्ये दांडिया महोत्सव आयोजित करण्यात येतात मात्र उस्मानाबाद सारख्या शहरात केवळ अर्चनाताईंच्या माध्यमातूनच ही संधी उपलब्ध करून देण्यात येते. 

मागील दोन वर्ष  कोरोना च्या संकटामुळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात येत न्हवतेमात्र आता पुन्हा मोठ्या उत्साहाने नवरात्र महोत्सव साजरा करण्यात येत आहे. शहरवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद या कार्यक्रमाला लाभला. दांडिया महोत्सवामध्ये सहभागी मंडळे व सहभागी जोडप्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. तसेच उद्या व परवा दिवशी ही महाराष्ट्रातील प्रसिद्ध अभिनेत्री येणार आहेत.  त्यामुळे गर्दीचा उच्चांक मोडण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top