अध्यक्षांनी भाषणात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या कार्याची माहिती दिली. अहिंसा, सत्य, मानवता यांच्याद्वारे देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. आदर्श जीवन जगण्याची पद्धत जगाला दाखवून दिली. हिंसा हा मार्ग नाही. लालबहादूर शास्त्री यांनी जय जवान, किसान असा नारा देऊन भारत देशाला बलशाली बनवले. मूर्ती लहान पण कीर्ती महान जगाला दाखवून दिले. या दोन्ही नेत्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांनी कार्य करावे अशी माहिती दिली.
श्री शेख अब्बास आली यांनी विद्यार्थ्यांना रघुपति राघव, राजाराम हे भजन म्हणून घेतले. श्री रत्नाकर पाटील, श्री पडवळ.के.आर, श्री दीपक खबोले यांनी भाषणे केली. विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी श्री जाधव चंद्रकांत, श्री शेषराव राठोड, श्री सूर्यकांत बर्दापुरे, श्री प्रशांत राठोड, श्री सुधीर कांबळे, श्री शानिमे कैलास,श्री सतीश कुंभार, श्रीमती व्यवहारे, श्रीमती कांबळे, श्रीमती सूर्यवंशी, श्रीमती तोगरगे, श्रीमती शितोळे मॅडम, श्री गोविंद बनसोडे, श्री रेवा चव्हाण, श्री वसंत भिसे, श्री रामलिंग आडे, श्री सचिन माळी, श्री बबन चव्हाण इत्यादी शिक्षक व कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्री दीपक खबोले मेसाई जवळगेकर यांनी आभार मानले.


