विद्यापीठ उपकेंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा
राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे कुलगुरूंना निवेदन
उस्मानाबाद -
उस्मानाबाद येथील विद्यापीठ उपकेंद्राच्या इमारतीसमोर डॉ.बाबासाहंब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा यासह विविध मागण्यांचे निवेदन डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांना राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाच्या वतीने देण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने कुलगुरूंची भेट घेऊन मागणीचे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले की गेल्या दहा वर्षापासून उस्मानाबाद येथे डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उपकेंद्र सुरू आहे. या उपकेंद्राच्या इमारतीसमोर डॉ.बाबासाहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा, तसेच विद्यापीठाप्रमाणे कमान उभारण्यात यावी, उस्मानाबाद येथे नव्याने होत असलेल्या शासकीय मेडिकल कॉलेजला माता रमाई आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतिक विभागाचे जिल्हाध्यक्ष विशाल शिंगाडे, सत्यविजय सुकाळे, सुगत सोनवणे, सागर चव्हाण यांची स्वाक्षरी आहे.