एक दिवसीय कब्रस्तान स्वच्छता मोहीम , एक दिन मरहुमिन के नाम
उस्मानाबाद : शहरात 'एक दिन मरहुमिन के नाम' या बिद्र वाक्याखाली एक दिवशीय कब्रस्तान स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरवर्षीय प्रमाणे याही वर्षी हजरत खाजा शमशुद्दीन गाजी रहमतुल्ला अलै दर्ग्याच्या पाठीमागील कब्रस्थान मध्ये स्वच्छता मोहीम शनिवारी 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 9 वाजल्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे.
कब्रस्तान मध्ये मोठी काटेरी झाडे झुडपे तसेच इतर घाण निर्माण झाली आहे. नागरिकांनी पुढे येऊन या स्वच्छते मोहिमेमध्ये सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकाकडून करण्यात आले आहे. 'एक दिन मरहुमिन के नाम' या बिद्र वाक्याखाली आपल्या घरातील मृत्यू झालेल्या नातेवाईकांच्या कबर वर भेट देऊन आजूबाजूचा परिसर स्वच्छ करावा. व स्वच्छते मोहिमेत सहभाग नोंदवावा असे आवाहन करण्यात आले आहे.