विशेष मोहीमेअंतर्गत जात वैधता प्रमाणपत्राचे वितरण
उस्मानाबाद,दि.15(जिमाका):- उस्मानाबाद जात प्रमाणपत्र पडताळणी समिती यांच्याकडून विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. समितीमार्फत विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळविणे सुलभ व्हावे याकरिता जिल्ह्याच्या विविध भागात शिबीरे घेण्यात येत आहेत.
दि. 12 नोव्हेंबर 2022 अभियांत्रिकी प्रवेशाची अंतिम तारीख होती आणि पुढील अभ्यासक्रमांचे सुध्दा प्रस्ताव निकाली काढण्यात आले आहेत. त्यामध्ये एम.बी.ए, बी.एड, डी फॉर्मसी, बी फॉर्मसी तसेच एल.एल.बी या विशेष मोहिमेचे औचित्य साधून सर्व कार्यालयातील कर्मचारी यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवून प्रकरणांचा निपटारा केला. दि.11 नोव्हेंबर 2022 रोजी समितीचे अध्यक्ष डॉ.बी.जी.पवार ,सदस्य बलभीम शिंदे आणि सदस्य सचिव बी.जी. अरवत या समिती सदस्यांनी एकूण 130 विद्यार्थ्यांना वेळेच्या आत जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित केले. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश झालेले आहेत, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य तथा उपायुक्त बलभीम शिंदे यांनी कळविले आहे.