google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 उस्मानाबाद जिल्ह्यात २ ठिकाणी लैंगीक अत्याचार , गुन्हे दाखल

उस्मानाबाद जिल्ह्यात २ ठिकाणी लैंगीक अत्याचार , गुन्हे दाखल

0




उस्मानाबाद जिल्ह्यात २ ठिकाणी लैंगीक अत्याचार , गुन्हे दाखल 

 


उस्मानाबाद जिल्हा : एक 4 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 09.12.2022 रोजी 19.00 वा. सु. शेजारील एक तरुणाच्या घरी खेळण्यासाठी गेली असता त्या तुरणाने घरी कोनी नसल्याची संधी साधून घराचे दार बंद करुन तीच्यावर लैंगीक अत्याचार केला. अशा मजकुराच्या पिडीत मुलीच्या आईने दि. 10.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376 (1), 376 (2) (जे), 376, (2) (आय) सह पोक्सो कायदा कलम- 4, 8 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

            दुसऱ्या घटनेत एक 20 वर्षीय मुलगी (नाव- गाव गोपनीय) दि. 06.12.2022 रोजी 12.30 वा. सु. आपल्या घरात एकटी असल्याची संधी साधून गावातीलच- एक तरुणाने तीच्या घरात घुसून त्या मुलीवर लैंगीक अत्याचार केला. तसेच घडल्या प्रकाराची वाच्यता केल्यास तीच्यासह तीच्या पित्यास ठार मारण्याची धमकी तीला दिली. अशा मजकुराच्या पिडीत मुलीने दि. 10.12.2022 रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरुन भा.दं.सं. कलम- 376, 452, 506 सह ॲट्रॉसिटी कायदा कलम- 3 अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top