मृद व जलसंधारण विभाग,उस्मानाबाद जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समिती,उस्मानाबाद

0



मृद व जलसंधारण विभाग,उस्मानाबाद जलयुक्त शिवार अभियान २.० जिल्हास्तरीय समिती,उस्मानाबाद

 

उस्मानाबाद,दि.11(जिमाका) महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियानाच्या पहिल्या यशस्वी टप्पयानंतर,आता राबविण्यात येणाऱ्या जलयुक्त शिवार 2.0 अभियानाच्या अनुषंगाने उस्मानाबाद  जिल्हयात या अभियानात काम केलेल्या पुर्वानुभवी स्वयंसेवी संस्था आणि काम करण्यास इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक उत्तरदायित्व निधी (C.S.R.) च्या सहाय्याने काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींशी संवाद व चर्चा बैठक आयोजित केली आहे.

जलयुक्त शिवार 2.0 अभियानाची जनजागृती करून यात लोकसहभाग वाढवण्याच्या उद्देशाने हि चर्चा संवाद बैठक महत्वपुर्ण ठरणार आहे.सदर बैठक 19 जानेवारी 2023 रोजी दु.12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सभागृह या ठिकाणी होणार आहे.

तरी जिल्हयातील स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींनी यासाठी वेळेवर उपस्थित रहावे,असे जिल्हा जलसंधारण अधिकारी तथा सदस्य सचिव जलयुक्त शिवार अभियान 2.0 उस्मानाबाद यांनी कळविले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top