चिखलीतील श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरासमोरील सभामंडपाचे लोकार्पण

0

चिखलीतील श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरासमोरील सभामंडपाचे लोकार्पण

उस्मानाबाद : चिखली येथील श्री संत बाळूमामा यांच्या मंदिरासमोरील सभामंडपाचे जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा सौ.अर्चनाताई पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब यांच्या आमदार निधी मधून सदरील कामासाठी ७ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला होता. या सभामंडपाचे बांधकाम पूर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंदाची भावना यावेळी दिसून आली.

याप्रसंगी श्री संत बाळूमामा मंदिराचे पुजारी श्री.नितीन महाराज, श्री.गजेंद्र महाराज, श्री.दुष्यंत चोबे, श्री.राजाभाऊ जाधव, श्री.सिद्धेश्वर गवळी, श्री.तेजस सुरवसे, श्री.कुंद पाटील, श्री.बाजीराव जाधव, श्री.रामकृष्ण अघोर, श्री.मोतीराम बोंदर, श्री.बाबा कदम, श्री.रवी सुरवसे, श्री.अण्णा चव्हाण, श्री.चेतन सुरवसे, श्री.पांडुरंग पाटील, श्री.संजय मुखडे, श्री.विश्वनाथ भोजने, श्री.सिद्धेश्वर पाटील, श्री.विकास गोडसे, श्री.राजाभाऊ आवटे, श्री.निवृत्ती मते, पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top