google.com, pub-1406548548385211, DIRECT, f08c47fec0942fa0 चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता मुळ मालकांस परत

चोरीच्या गुन्ह्यातील हस्तगत मालमत्ता मुळ मालकांस परत

0


 

        उस्मानाबाद जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांतर्गत दाखल झालेल्या चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावून चोरीस गेलेला माल पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकां मार्फत जप्त केला जातो व मुळ मालकांना स्वाधीन केला जातो. गेल्या तीन महिन्यात पोलिंसानी वाशी पो.ठा.च्या 3, उस्मानाबाद ग्रामीण 5, येरमाळा 1, तुळजापूर 5, ढोकी 1, तामलवाडी 2, बेंबळी 1,आनंदनगर 6 अशा चोरीच्या 24 गुन्ह्यातील जप्त केलेल्या पाच मोटारसायकल, चार मोबाईल फोन, 350  ग्रॅम सुवर्ण दागिणे आज दि.01.02.2023 रोजी पोलीस मुख्यालयात मा. पोलीस अधीक्षक श्री. अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आला. मौल्यवान माल परत मिळवून दिल्याबद्दल या प्रसंगी मालमत्ता धारकांने पोलीसांचे आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top