ढोकी येथे पहिलेच “माऊली कोल्डप्रेस ऑइल मिल “ या मिलचे उद्घाटन आमदार कैलास घाडगे-पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
रणजित माने यांनी हा व्यवसाय सुरू केला आहे. पारंपारीक पध्दतीने शेंगदाणा ,करडी ,मोहरी,मोहरी ,जवस, सूर्यफूल ,खोबरेल, तीळ आदी पासून 100 टक्के शुद्ध नैसर्गिक व रसायनामुक्त खाद्यतेल यामीलद्वारे मिळणार आहे ,त्याबरोबरच जनावरांसाठी शुद्ध पेंड मिळेल . या मिलच्या तेलामुळे मुळे सर्वसामान्यांचे आरोग्य नक्कीच सुधारेल असा आशावाद आमदार कैलास घाडगे-पाटील यांनी व्यक्त केला.
याप्रसंगी संग्राम देशमुख , अमोल पापा समुद्रे , उद्धव आण्णा समुद्रे ,डी एम पाटील , सागर बाराते ,श्री राजभाऊ कोळी ,बाबुराव बप्पा समुद्रे , विलास पाटील सह पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते .