वैद्यनाथ मंदिर परळी शिष्टमंडळाची तुळजाभवानी मंदिर संस्थांनला भेट

0

वैद्यनाथ मंदिर परळी शिष्टमंडळाची तुळजाभवानी मंदिर संस्थांनला भेट

तुळजापुर प्रतिनिधी 
परळी येथील वैद्यनाथ मंदिर विश्वस्त व अधिकारी यांनी शुक्रवारी दुपारी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थांनला भेट देऊन प्रासाद अंतर्गत विकास योजनेची सविस्तर माहिती घेतली.प्रारंभी सर्व मान्यवरांचे स्वागत व्यवस्थापक तहसीलदार योगिता कोल्हे, लेखाअधिकारी सिद्धेश्वर शिंदे ,धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळे मुख्याधिकारी अरविंद नातू यांनी स्वागत केले. या शिष्टमंडळात बीडच्या उपजिल्हाधिकारी नम्रता साठे तहसीलदार तथा अध्यक्ष सुरेश शेजुळ सचिव राजेश देशमुख विश्वस्त अनिल तांदळे प्रदीप देशमुख विजयकुमार मेनकुदळे प्रा. बाबासाहेब देशमुख रघुवीर देशमुख मंदिर अभियंता मुकुंद देशपांडे व पुजारी राजाभाऊ गुरव यांचा समावेश होता. प्रारंभी सर्व सदस्यांनी श्री तुळजाभवानीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर मंदिर संस्थांनतर्फे सर्वांचा सत्कार करण्यात आला. तुळजाभवानी मंदिर दर्शन मंडप, अभिषेक मंडप याची यावेळी त्यांनी पाहणी केली .यानंतर मंदिर संस्थांनचे अधिकारी व शिष्टमंडळातील सर्व सदस्य यांच्यात प्रासाद अंतर्गत तुळजाभवानी मंदिर संस्थान मंदिर व परिसराचा कसा विकास करणार आहे ?त्याचा आराखडा कसा तयार करण्यात आला आहे?त्यासाठी लागणारा खर्च किती आहे ? कँरीडारची रचना कशी असणार आहे.यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. परळी येथील वैद्यनाथ मंदिराला आगामी काळात प्रासाद अंतर्गत काही कोटीचा निधी मिळणार आहे.याकरिता त्याची पूर्वतयारी म्हणून या शिष्टमंडळाने भेट दिली होती.यासाठी तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या माजी अध्यक्षा तथा बीड जिल्हाधिकारी दिपाली मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली या मंडळांनी तुळजाभवानी संस्थांनला भेट दिली व माहिती घेतली असे वैद्यनाथ मंदिर संस्थांनच्या विश्वस्ताने सांगितले. यावेळी मंदिर अभियंता राजकुमार भोसले प्रदीप अमृतराव उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)
To Top