आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील कार्याचा आढावा
मुंबई : आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांनी घेतला सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागातील कार्याचा आढावा घेतला.
सार्वजनिक आरोग्यसेवा अधिक दर्जेदार देण्यासाठी नियोजित योजनांचा आढावा वरिष्ठ अधिकारी यांच्या बैठकित घेण्यात आला. या बैठकीत नवीन रुग्णवाहिका ह्या पीपीपी (पब्लिक, प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्वावर घेणे. राज्यात किडनी प्रत्यारोपण संदर्भात काही अनुचित/अवैध प्रकार घडू नये यासाठी किडनी रॅकेट समितीचे गठन करण्यात आले आहे. युती सरकारने घोषित केल्याप्रमाणे ५०० ठिकाणी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करणे याची प्रगती याबाबत चर्चा करण्यात आली. समाजातील सर्व स्तरातून कौतुक केलेला माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियानाचा टप्पा क्रमांक दोनची अंमलबजावणी करणे. सार्वजनिक आरोग्य विभागातील रिक्त पदांची पदभरती करणे, तसेच अ, ब, क व ड श्रेणी कर्मचाऱ्यांचे बदली धोरणही निश्चित करण्यात आले. अर्थसंकल्पीय अधिवेशनात घोषित केल्याप्रमाणे कामाच्या ठिकाणी हिरकणी कक्ष स्थापित करण्यासाठी एक एसओपी तयार करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या. यासोबतच मेळघाटातील आरोग्य प्रश्न व उपाययोजना अंमलबजावणी यावर चर्चा करण्यात आली. उद्याच्या निरोगी महाराष्ट्रासाठी जागृक पालक सुदृढ बालक या मोहिमेची अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. सध्या राज्यात वाढत असलेल्या कोविड१९ एच१एन१, एच३एन२ च्या वाढत्या संसर्गाबाबत आढावा घेण्यात आला व संबंधितांना त्या संदर्भात सूचना देण्यात आल्या.
प्रशासकीय मान्यता मिळालेल्या तथापि निविदा प्रक्रिया सुरू न केलेल्या आरोग्य संस्थांचा देखील आढावा यावेळी घेण्यात आला.