भारत राष्ट्र समिती पक्षाची सदस्य नोंदणीला नळदुर्ग शहरात मोठा प्रतिसाद
तुळजापूर:- भारत राष्ट्र समिती चे प्रमुख तथा तेलंगणा राज्यायाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे प्रभारी आ. जीवन रेड्डी , शकंर अण्णा धोडंगे , मा. खासदार हरी भाऊ राठोड , मा. हिमानुशी तिवारी, मा.माणिकराव कदम, मराठवाडा प्रमुख सोमनाथ थोरात, सुधीर बिंदू , गनेशजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तुळजापूर तालुक्यातील नळदुर्ग शहरात 22 जुन रोजी प्रत्यक्ष शेतकरी, नागरिक, युवकांची भेट घेऊन "भारत राष्ट्र समिती" पक्षाचे ध्येय, धोरण, काम यांची सुनील चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत व अरविंद घोडके, सुरज बचाटे व टीमने माहिती दिली नळदुर्ग शहरातील लीडर अझर शेख , व्यंकट राठोड,अहेमदअली मणियार, शमशोद्दीन शेख, अली शेख, हिमायतअली मौजन, वसीम सय्यद, मुतंलीब मौजन, अनवर शेख, ताहेरअली मौजन, रब मौजन, सादीकअली शेख, करणं लोखंडे यांनी भारत राष्ट्र समिती पक्षात प्रवेश केला व या ठिकाणी 445 सदस्य नोंदणी करण्यात आली.
यावेळी नळदुर्ग शहरात प्रमुख चौकात पक्षाचे झेंडे, बनर लावून "भारत राष्ट्र समितीचे" मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करण्यात आली पक्ष नोंदणीसाठी शहरी भागात देखील मोठ्या प्रतिसाद मिळत आहे.